माधुरी सुदाने साकारली 4228 चौरस फुटाची रांगोळी अमरावती : भारतात होऊ घातलेल्या जी २० परिषदेच्या आयोजनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील रांगोळी कलाकार माधुरी सुदा यांनी स्थानिक शारदा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण एकूण ४२२८ चौरस फुटाची भव्यदिव्य रांगोळी काढून अभिनंदनाचा संदेश दिला. पधारो म्हारे देस अतिथी देवो भव हे ब्रीदवाक्य घेवून ही रांगोळी काढण्यात आली.
जी 20 परिषदेचे अध्यक्षपद : जी 20 समूहाचे शिखर संम्मेलन भारतात पहिल्यांदा होत आहे. जी 20 देशाचे अध्यक्षपद भारताला मिळाले आहे. 20 देशांचे प्रतिनिधी आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या स्वागतासाठी जोडलेल्या राष्ट्रांच्या प्रतिनिधींचे स्वागतासाठी ही रांगोळी साकारण्यात आली. माधुरी सुदा आणि शुभम क्लासेस यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबविला.
जी-20 च्या लोगोची रांगोळी
दहापेक्षा अधिक विश्व रेकॉर्ड : माधुरी सुदा यांनी रांगोळीच्या माध्यमातून आतापर्यंत दहापेक्षा अधिक विश्व रेकॉर्ड केले आहेत. जी20 लोगोची रांगोळी साकारण्याकरिता त्यांना सारिका वाकडे, रुपाली गायकवाड, गंगोत्री गंगन, काजल साबू, पंकज देशपांडे, हरिओम साबळे, शुभम गावंडे, सागर विश्वकर्मा यांचे लाभल्याचे माधुरी सुधा यांनी सांगितले.
रांगोळीचे व्यवस्थापन : रांगोळीचे सगळे व्यवस्थापन प्रेमचंद अग्रवाल गणगौर यांनी केले. भाजप शहराध्यक्ष किरण पातूरकर यांच्या हस्ते या रांगोळीचे उद्घाटन करण्यात आले. माजी नगरसेवक मिलिंद बांबल, अलका सप्रे, श्रद्धा गेहलोद, पुष्पाताई लांडगे तसेच शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व एच एस सी ऑफिसरचे प्राचार्य विशाल भोयर, पर्यवेक्षक आकाश भोयर, डॉ. अमोल भोयर यावेळी उपस्थित होते.
जी-20 मध्ये कोणते देश? : जी-20मध्ये भारत, इंडोनेशिया, इटली, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, अमेरिका, आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश आहे. G20 ही जागतिक आर्थिक सहकार्याची प्रभावशाली संघटना आहे. हे जागतिक जीडीपीच्या सुमारे 85 टक्के, जागतिक व्यापाराच्या 75 टक्क्यांहून अधिक आणि जगाच्या सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते.
हेही वाचा :Ajit Pawar On Cibil Issue : शासन निर्णयाला केराची टोपली ; पीक कर्जासाठी बँकांकडून ‘सीबील’ सक्ती, वचक नसल्याने बेसूमार लूट - अजित पवार