अमरावती:अमरावती शहरातील औषधी व्यवसायिक उमेश कोल्हे यांची 21 जुलै रोजी शहरातील घंटी घड्याळ परिसरात रात्री 10:30 वाजता हत्या झाली ( Umesh Kolhe Murder Case ). या हत्येमुळे शहर हादरले. उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास एन आय करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 7 जणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हे यांच्या आत्म्याला शांती मिळावी ( give peace to Kolhes soul ), यासाठी खासदार नवनीत आणि आमदार रवी राणा यांनी (Rana couples) कोल्हे कुटुंबीयांसह लोकमान्य कॉलनी परिसरात घरालगत असणाऱ्या हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण केली (Rana couples Hanuman Chalisa recitation) . यावेळी कोल्हे कुटुंबीयातील सदस्यांसह युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट:नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट ठेवल्यामुळे अमरावतीमधील औषध विक्रेते अमोल कोल्हे यांची निर्घृण हत्या ( Umesh Kolhe Murder Case ) करण्यात आली. या प्रकरणी सात शेख इरफान शेख रहीम या मास्टर माईंडसह सात जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. मात्र, आता त्यानंतर अमरावती शहरातील ज्या व्यक्तींनी ही पोस्ट ठेवली होती त्यांनाही धमक्या येऊ लागल्याचे समोर आले. दरम्यान या हत्या प्रकरणाला नुपूर शर्मा च्या समर्थनातील पोष्टची बाब समोर आली आणि हे प्रकरण देश पातळीवर गाजले. तसेच याचा तपास एनआयये ने हातात घेतला. यातील आरोपींची आता एनआयए तपास करत आहे. सगळे आरोपी त्यांच्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडून काय खुलासे होतात यावर सगळ्यांचे लक्ष आहे. प्राथमीक तपासात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानेच हा प्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे.
असा रचला हत्येचा कट : यानंतर शेख इरफान शेख रशीद याने उमेश कोल्हे यांच्या हत्येचा संपूर्ण कट रचला. या कटात शोएब खान, मुदलीस अहमद, आतिफ रशीद, अब्दुल तोफिक, शाहरुख पठाण आणि डॉक्टर युसुफ खान हादेखील सहभागी झाला. यानंतर उमेश कोल्हे हे आपले औषधीचे दुकान कधी उघडतात, कधी बंद करतात ते कोणत्या मार्गाने घरी जातात याची संपूर्ण माहिती शेख इरफान शेख रशीद यांनी काढली. यानंतर 21 जूनच्या रात्री साडेदहाच्या सुमारास उमेश कोल्हे हे औषधीचे दुकान बंद करून घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना रस्त्यात गाठुन मुलगा आणि सुने समोरच त्यांचा गळा चिरुन पळून गेले उपचाराच्या वेळी त्यांचा मृत्यू झाला.
शेख इरफान शेखचा सहभाग -शहरातील डॉक्टर गोपाल राठी यांना राजीक मिर्झा नावाच्या व्यक्तीने मोबाईल फोनवर कॉल करून तुम्ही नुपूर शर्माच्या समर्थनात व्हॉट्सअप स्टेटस का ठेवले? असा प्रश्न विचारून त्यांना तुमच्या विरोधात आम्ही सगळे एकत्रित येऊ हे योग्य नाही. नुपूर शर्माचे समर्थन तुम्हाला का करावेसे वाटले याचा खुलासा करा आणि व्हॉट्सअपवरच आमची जाहीर माफी मागा अन्यथा परिणाम योग्य होणार नाही अशा स्वरुपाची धमकी दिली आहे. याच व्यक्तीने शहरातील जय मोबाईलच्या संचालकांना देखील अशा स्वरूपाचा कॉल करून धमकावले आहे. धमकी देणारा अमोल कोल्हे हत्या प्रकरणातील मास्टर माईंड शेख इरफान शेख रहीमच्या संघटनेचा कार्यकर्ता आहे.
गृहमंत्र्यांनी घेतली दखल -दरम्यानअमोल कोल्हे हत्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यात लक्ष घातले. हे प्रकरण एनआयएकडे देण्यास सांगितले आहे. एनआयएकडे हे प्रकरण दिले जाणार असल्याचे लक्षात येताच अमरावती पोलिसांनी वेगाने पावले उचलत या प्रकरणातील आरोपींची धरपकड सुरू केली. केंद्राकडून सुत्रे हलताच अमरावती पोलिसांनीही अमोल कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ त्यांनी पोस्ट केल्यानेच झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी मास्टरमाईंडसह सात जणांना अटक करण्यात आली. आता या प्रकरणात मोबाईल कॉल करून धमक्यांचे प्रकरणही जोडले गेले. त्यादृष्टीने गांभीर्याने तपास सुरू आहे.