अमरावतीRana Couple Diwali Amaravati:अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांनी आज (रविवारी) आपल्या शंकर नगर स्थित निवासस्थानी शहरातील अंध, अपंग अशा असंख्य दिव्यांगांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी उपस्थित दिव्यांगांना नवीन कपडे आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं. विशेष म्हणजे, या सोहळ्यात भ्रमणध्वनीद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उपस्थित सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. (Rana Couple Diwali 2023 Celebration)
सोहळ्यात आला उपमुख्यमंत्र्यांचा फोन :राणा दाम्पत्याच्या वतीनं दिव्यांगांसाठी आयोजित खास दिवाळी कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे नेहमीच गरिबांसह दिव्यांगांसोबत सण उत्सव साजरे करतात. याबद्दल राणा दाम्पत्याचं कौतुक केलं. "सण, उत्सव, आनंद हा सर्व समाजासोबत साजरा केला तर त्याचा गोडवा अधिक असतो आणि त्याचे पुण्य देखील अधिक असते" असे देखील उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी सोहळ्यात उपस्थित सर्व दिव्यांगांना शुभेच्छा देखील दिल्या. "दिव्यांगांना दर महिन्यात पंधराशे रुपये मानधन दिलं जाणार असून डिसेंबर महिन्यापासून वाढीव मानधन हे नियमित तारखेलाच मिळेल", असं सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.