अमरावती - दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कळमकर परिवाराच्या वतीन रामलाडूचे वाटप करण्यात आले. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतून भाविक उपस्थित होते.
अमरावतीतील येवदा येथे रामनवमी साजरी, 'रामलाडू'च्या महाप्रसादाचे वाटप - mahaprasad
येवदा येथील कळमकर परिवार गेल्या चार पिढ्यांपासून रामलाडूचे वाटप करत आहे. पाच कडधान्यापासून बनविलेला हा लाडू रामनवमीचे खास आकर्षण असतो.
येवदा येथील कळमकर परिवार गेल्या चार पिढ्यांपासून रामलाडूचे वाटप करत आहे. पाच कडधान्यापासून बनविलेला हा लाडू रामनवमीचे खास आकर्षण असतो. या लाडूमागे एक अख्यायिका गावकरी सांगतात. कोण्या एके काळी कारंजा लाड येथील नामदेव महाराज राम जन्मोत्सवानिमित्त येवदा येथील शिवराम कळमकर यांच्या घरी आले. त्यांनी घरोघरी जाऊन पाच कडधान्य जमा केले. या कडधान्यापासून लाडू करुन त्याचे महाप्रसाद म्हणून वाटप केले.
तेव्हापासून कळमकर परिवार ही प्रथा पाळत आहेत. त्यानंतर संपत कळमकर, रामदास कळमकर आणि आता चौथ्या पिढीत सुनिल कळमकर, नाना रामदास कळमकर, विलास कळमकर ही परंपरा पाळत आहेत. हे लाडू तयार करण्यासाठी नामदेव महाराजांचे भक्त मूर्तीजापूर जांभा, कारंजा लाड अशा अनेक गावातून महाप्रसादाचे साहित्य एकत्र करतात. यासाठी कुणाकडूनही पैसे घेतले जात नाहीत.