महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५१ व्या पुण्यातिथीनिमित्त रामदेव बाबा राहणार उपस्थित - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला योगगुरू रामदेव बाबा उपस्थित राहणार आहेत. रविवारपासून या सप्ताहाला सुरुवात होत आहे.

राष्ट्रसंतांची ५१ वी पुण्यातिथी

By

Published : Oct 12, 2019, 6:47 PM IST

Updated : Oct 12, 2019, 8:36 PM IST

अमरावती - अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 51 व्या सुवर्ण पुण्यतिथी सप्ताहाला रविवारी अमरावतीच्या गुरुकुंज आश्रम मोझरीमध्ये सकाळी तीर्थस्थापनेने सुरुवात होणार आहे. येत्या 19 तारखेला देशभरातील लाखो गुरुदेव भक्त हे तुकडोजी महाराज यांना आदरांजली वाहणार आहे. या कार्यक्रमाला योगगुरू रामदेव बाबाही उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रसंतांची ५१ वी पुण्यातिथी

पुण्यतिथी सप्ताहामध्ये विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 20 तारखेला गोपाल काल्याने राष्ट्रसंताच्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.

हे वाचलं का? - राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीतही पेटली होती देशाच्या स्वातंत्र्याची मशाल

राष्ट्रसंताच्या 51 व्या पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात ही रविवारी पहाटे 4.30 वाजता तिर्थस्थापना, चरणपादुका व महासमाधी पूजन करून होईल. त्यानंतर 5.30 ते 6.30 वाजता ध्यान होईल. सकाळी 6.45 ते 9 वाजता राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची शोभायात्रा गुरुकुंज मोझरी गावातून निघेल. सकाळी 10 ते 5 वाजता एकल अभंग गीत गायन स्पर्धा होईल. सायंकाळी 6 ते 7 वाजता सामुदायिक प्रार्थना, रात्री 7.15 ते 8.15 पर्यंत खंजरी भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर किर्तनाचा कार्यक्रम होईल.

Last Updated : Oct 12, 2019, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details