अमरावतीRamdas Athawale On Lok Sabha Election :खासदारनवनीत राणा आगामी लोकसभेसाठी उमेदवार असल्यास माझा पूर्ण पाठिंबा असेल, त्या एनडीएचा घटक पक्ष असून लोकसभेत चांगल्या पद्धतीनं प्रश्न मांडतात. माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळं आपला पाठिंबा नवनीत राणा यांना कायम राहणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तसंच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. एका खासगी कार्यक्रमासाठी ते आजल अमरावती शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
लोकसभा निवडणूक लढवणार :बोलतांना राज्यसभा खासदार आठवले पुढे म्हणाले की, माझे राज्यसभा सदस्यत्व 2026 पर्यंत आहे. मात्र, आगामी 2024 च्या निवडणुकीत मी शिर्डी मतदारसंघातून उभे राहण्याची चाचपणी करत आहे. शक्य झाल्यास मी या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला किती जागा मिळणार याबाबत बोलताना ते म्हणाले की, आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहेत. जागेबाबत अजून काही निर्णय झालेला नाही. आम्ही कितीही जागा मागितल्या तरी त्या त्यांनी दिल्या पाहिजे. सदाशिव लोखंडे हे सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळं मला शिर्डी मतदारसंघाची जागा मिळेल की, नाही याबाबत शंका आहे. पण मी प्रयत्न करणार असल्याचं आठवले यांनी म्हटलंय.
नवनीत राणांना आरपीआयचा पाठिंबा :नवनीत राणा यांना 2024 मध्ये भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिल्यास आम्ही त्याच्यासोबत राहू. "ते आमच्या एनडीएच्या घटक आहेत. त्यामुळं आम्हाला त्यांच्यासोबत राहायचं आहे. "त्यांना निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा त्यांना पाठिंबा असेल, अशी माहिती खासदार आठवले यांनी दिली. त्यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा तांत्रिक आहे. त्यामुळं आम्ही त्यावर भाष्य करणार नाही, तो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. मात्र आमचा पक्ष एनडीएचा घटक असल्यानं त्यांना पाठिंबा देण्याबाबत शंका नाही, असं देखील ते म्हणाले.
बाळासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व चांगलं :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साकारलेला अखंड बौद्ध समाज विविध लहान-मोठ्या गटांमध्ये विभागलेला आहे. त्यामुळं विखुरलेल्या समाजाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व चांगलं असून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला आवडेल. "मी अनेकवेळा आंबेडकरी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यात अनेकदा अयश आल्याचं आठवले यांनी सांगितलंय."
हेही वाचा -
- Eknath Shinde On Maratha Reservation : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, आरक्षण देणार पण...
- Prakash Ambedkar : महिलेची धिंड काढणाऱ्या भाजपा नेत्यावर गुन्हा दाखल करा - प्रकाश आंबेडकर
- Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; सरकारला शेवटचा इशारा