अमरावती - रामनवमी निमित्त शनिवारी सायंकाळी अमरावतीत भव्य मिरवणूक निघाली. बालाजी प्लॉट परिसरातून निघालेल्या या मिरवणुकीत श्रीरामांच्या चरित्रावर आधारित विविध प्रसंगांचे देखावे विशेष आकर्षण ठरले. ढोल, ताशे आणि डीजेच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीने अमरावती शहर दुमदुमले.
अमरावतीत रामनवमी निमित्त निघाली मिरवणूक - Amravati
विश्व हिंदू परिषदेच्यावतीने या मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत श्रीरामांच्या चरित्रावर आधारित विविध प्रसंगांचे देखावे विशेष आकर्षण ठरले.
विश्व हिंदू परिषदेच्यावतीने ही मिरवणूक काढण्यात आली. बालाजी प्लॉट येथून निघालेल्या या मिरवणुकीचे राजपेठ, राजकमल चौक, जयस्तंभ, जवाहर गेट, सराफ बाजार या भागात जल्लोषात स्वागत करण्यात आले. मिरवणुकीत श्री रामाच्या जन्मापासून रावण वधापर्यंतचे विविध देखावे साकारण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि शहरातील विविध सांस्कृतिक मंडळ, सामाजिक संस्था यांनी साकारलेले हिंदू धर्मातील मुख्य सण, संस्कृती यांचे देखावे खास आकर्षण ठरले.
भारतीय सैन्याकडे असलेल्या ब्राम्होस मिसाईलची प्रतिकृतीही मिरवणुकीत लक्ष वेधत होती. बैलगाडीवर स्वार श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीचे दर्शन भाविक घेत होते. या मिरवणुकीनिमित्त राजकमल चौक भगव्या पताकांनी सजविण्यात आला होता. मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात होती.