अमरावती - प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यमंत्र्याची राहुटी, हा कार्यक्रम आपल्या गावात राबवला आहे. मतदारसंघातील शिरजगाव कसबा या गावापासून त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली आहे. गावातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या गावातच निकाली काढण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. उपक्रमाच्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
अमरावतीतील शिरजगाव कसबा येथे 'राज्यमंत्र्यांची राहुटी' हेही वाचा... 'कोरेगाव-भीमा प्रकरणी एनआयए चौकशीचे केंद्राचे पत्र मिळाल्यानंतर पुढील पाऊल उचलणार'
30 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या 15 दिवसांच्या कालावधीसाठी मतदारसंघात हा उपक्रम घेण्यात येत आहे. थेट मंत्री बच्चू कडू लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गावात, घरापर्यंत पोहचले आहेत. यात स्वतः बच्चू कडू मंडपात बसून नागरिकांनी आणलेली कामे समजावून घेत, अधिकाऱ्यांना सांगत आहेत.
हेही वाचा... 'जामिया'त तरुणाचा आंदोलकांवर गोळीबार, कुटुंबीयांना बसला धक्का
यापूर्वी आमदार असतानाही कडू यांच्याकडून हा उपक्रम राबवण्यात येत होता. आता, मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतरही त्यांनी ही सेवा सुरूच ठेवली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू हे आपल्या सेवाव्रत कामासाठी परिचित आहेत. सर्वसामान्य, गरिब अन् दिव्यांग व्यक्तींसाठी ते नेहमीच धावून जातात.
अमरावतीत राज्यमंत्री बच्चू कडू यांचा अभिनव उपक्रम... सर्वसामान्यांसाठी 'राहुटी' उपक्रमाला सुरुवात... हेही वाचा... हिंगोलीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी फोडले विमा कंपनीचे कार्यालय, ठिय्या आंदोलन सुरू
आमदार असतानाही कडू यांनी आपल्या मतदारसंघात ''आमदाराची राहुटी आपल्या गावात'' ही योजना राबवली होती. हीच योजना आता राज्यमंत्र्याची राहुटी आपल्या गावात, अशी बनली आहे. या उपक्रमात सर्व शासकीय अधिकारी येतात. समस्या घेऊन आलेल्या नागरिकांची कामे येथे होतात. या उपक्रमामुळे आता नागरिकांना शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नसून गावातच लोकांची कामे होत आहे.