अमरावती- राज्यातील151 विधानसभा मतदारसंघात निघणाऱ्या भाजपच्या महाजनादेश यात्रेचा शुभारंभ सोहळ्यात गुरुवारी सहभागी होण्यासाठी गुरुकुंज मोजरीला येणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा रद्द झाला आहे. अमित शाह यांच्या जागी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या महाजनादेश यात्रेच्या शुभारंभ सोहळ्यात सहभागी होणार आहेत. याबाबत अमरावतीचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
अमित शाह यांचा दौरा रद्द; महाजनादेश यात्रेला येणार राजनाथ सिंह - महाजनादेश यात्रा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात राज्याचा जो कायापालट केला याची माहिती राज्यातील सर्व जनतेला व्हावी, या उद्देशाने महाजनादेश यात्रा गुरुवारपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतून निघणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात राज्याचा जो कायापालट केला याची माहिती राज्यातील सर्व जनतेला व्हावी, या उद्देशाने महाजनादेश यात्रा गुरुवारपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतून निघणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशाचे गृहमंत्री अमित शाह या यात्रेत सहभागी होणार होते. आता ऐन वेळेवर अमित शाह कुठल्यातरी कारणामुळे येऊ शकणार नाहीत, असे डॉ. अनिल बोंडे म्हणाले. अमित शाह यांच्या जागी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह येणार असल्याचे अनिल बोंडे यांनी सांगितले.
महाजनादेश यात्रेच्या शुभारंभ सोहळ्याला 1 लाखाच्यावर नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहितीही डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. पत्रकार परिषदेला आमदार डॉ. सुनील देशमुख आणि भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी उपस्थित होते.