अमरावती - प्रकाश आंबेडकर यांच्या मुळेच आज भाजप प्रणीत एनडीए सरकार सत्तेत आले आहे. कळत नकळत त्यांच्याकडून ही चूक घडलेली आहे. मला ईव्हीएमवर संशय नाही, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राजेंद्र गवई यांनी म्हटले आहे. नवनीत राणा यांच्या अमरावतीत झालेल्या विजयानंतर ते ई-टीव्ही भारतशी बोलत होते.
प्रकाश आंबेडकर यांच्या मुळेच एनडीए सत्तेत, ईव्हीएमवर संशय नाही - राजेंद्र गवई - अमरावती
प्रकाश आंबेडकर यांच्या मुळेच आज भाजप प्रणीत एनडीए सरकार सत्तेत आले आहे, असे मत राजन गवई यांनी व्यक्त केले आहे.
अमरावती मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा यांच्यासोबत आम्ही होतो. त्यांच्या प्रत्येक सभेत आम्ही सातत्याने पुढे होतो. या मतदारसंघातील आंबेडकरी विचाराचे एकही मत आम्ही इकडे तिकडे जाऊ दिले नाही. येथे बीएसपी किंवा वंचित आघाडीला मते मिळाली नाही. संपूर्ण आंबेडकरी समाज माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मागे उभा राहिला आणि त्यांनी अमरावतीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद आहे, हे दाखवून दिले. अशीच ताकद आम्हाला दिली, तर ती संपूर्ण महाराष्ट्रात दाखवू, असे राजेंद्र गवई म्हणाले.