महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीच्या चार तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस - गारवा

दुपारी 4 वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला काही सरी पडल्यानंतर काही वेळाने पुन्हा गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. ग्रामीण भागातील काही ठिकाणी पावसामुळे वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.

अमरावतीच्या चार तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

By

Published : Jun 22, 2019, 10:59 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील वरुड, नांदगाव खंडेश्वर, चांदुर बाजार, दर्यापूर या चार तालुक्यांमध्ये पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. तर भातकुली तालुक्यात हलक्या पावसाच्या सरी झाल्यात. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांचे तारांबळ उडाली. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दमदार पावसाची शक्यता होती.

अमरावतीच्या चार तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

दुपारी 4 वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला काही सरी पडल्यानंतर काही वेळाने पुन्हा गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. ग्रामीण भागातील काही ठिकाणी पावसामुळे वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. कार्यालय सुटण्याची वेळ असल्यामुळे घरी निघालेल्या नागरिकांची तारांबळ उडाली होती.

मागील 4 महिन्याच्या उकाळ्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पण आता या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हा पाऊस १ तास चालला. या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले होते. या पावसामुळे शेतकऱ्यांना आता काही अंशी दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details