महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, विजेच्या कडकडाटासह गारपीट - विजेच्या कडकडाटासह गारपीट

अमरावती जिल्ह्यातील काही भागात सायंकाळी तर काही ठिकाणी रात्री विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यात गहू व हरभरा पिकांना फटका बसला होता.

rain in amarawati district
अमरावती जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, विजेच्या कडकडाटासह गारपीट

By

Published : Mar 18, 2020, 3:48 AM IST

अमरावती- जिल्ह्याला आज 10 दिवसानंतर पुन्हा गारपीटचा तडाखा बसला आहे. यात अचलपूर तालुक्यातील धानोरा गावात गारपीट झाली तर तिवसा तालुक्यातही अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. रब्बी हंगामातील गहु, हरभरा पिकांसह फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अमरावती जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, विजेच्या कडकडाटासह गारपीट
अमरावती जिल्ह्यातील काही भागात सायंकाळी तर काही ठिकाणी रात्री विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस पडला. दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यात गहू व हरभरा पिकांना फटका बसला होता. आज पुन्हा गारपीटीसह वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले तर वादळी पावसामुळे वीज पुरवठा देखील खंडीत झाला आहे. नेहमीच अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details