महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मान्सुनची चाहुल; अमरावतीत वादळी वाऱ्यासह पाऊस - whether dept

गेल्या चार महिन्यांपासून उन्हाच्या कडाका सहन करणाऱ्या अमरावतीकरांना अचानक बदललेल्या वातावरणाने चांगलाच दिलासा मिळाला आहे.

वादळी वाऱ्यासह पाऊस

By

Published : Jun 4, 2019, 6:50 PM IST

अमरावती- शहरात आज (मंगळवार) वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. गेल्या चार महिन्यांपासून उन्हाच्या कडाका सहन करणाऱ्या अमरावतीकरांना अचानक बदललेल्या वातावरणाने चांगलाच दिलासा मिळाला आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे तापमानामध्ये घट झाली आहे.

वादळी वाऱ्यासह पाऊस

आज सकाळी नेहेमीप्रमाणे सूर्य तळपत असताना सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा वाहायला लागला आणि जोरदार पाऊस कोसळला. वादळ वाऱ्यामुळे अमरावतीकरांची तारंबळ उडाली. पुर्वमान्सून पावसामुळे अमरावतीकर सुखावले आहेत. पहिल्याच पावसामुळे सर्वदूर मातीचा सुगंध दरवळत आहे. गेल्या चार महिन्यापासून संपुर्ण महाराष्ट्राने प्रचंड उन्हाचा सामना केला. मात्र, आता मान्सुनची चाहुल लागली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details