अमरावती - अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसह सर्वजण पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर आज अमरावती शहरात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे मात्र नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे.
अमरावतीत बरसला पाऊस ; उकाडा कायम - tree
दोन दिवसाच्या प्रतिक्षेतनंतर अमरावतीत आज पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. मात्र हवामानात उकाडा कायम होता.
अमरावतीत पाऊस बरसला
अमरावती जिल्ह्यासह काही भागात ७ आणि 8 जूनला वादळासह आलेल्या पावसाने झाडांची आणि विजेच्या खांबांची पडझड झाली होती. त्यानंतर पाऊस पुन्हा गायब झाला. दोन दिवसाच्या पावसानंतर हवामानात पुन्हा उकाडा सुरू झाला. पुन्हा एकदा अमरावतीकर कडक उन्हाचा सामना करीत असताना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस बरसत होता. या पावसाने चैतन्य निर्माण झाले झाले असले तरी वातावरणात उकाडा कायम आहे.