महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत अवैध गावठी दारूवर छापा; 3 लाखांचा मुद्देमाल जप्त - chandur railway police station

चांदूर रेल्वे तालुक्यातील गौरखेड व तरोडा परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळली जात असल्याची माहिती चांदूर रेल्वे पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी याठिकाणी छापा टाकत ९० ड्रम मोह सडवा आणि गावठी दारू असा एकूण २ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे.

अमरावतीत अवैध गावठी दारूवर छापा; 3 लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावतीत अवैध गावठी दारूवर छापा; 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

By

Published : Mar 9, 2020, 8:36 AM IST

अमरावती - अमरावती जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईचा सपाटा सुरूच आहे. जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील गौरखेडा आणि तरोडा याठिकाणी गावठी दारूवर छापा टाकण्यात आला. यात 2 लाख 94 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चांदूर रेल्वे पोलिसांनी केली.

चांदूर रेल्वे तालुक्यातीव गौरखेड व तरोडा परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळल्या जात होती, अशी माहिती चांदूर रेल्वे पोलीसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी याठिकाणी छापा टाकत ९० ड्रम मोह सडवा आणि गावठी दारू असा एकूण २ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे. यात आरोपी गिरीष पवार, मनोज पवार, लोकेश पवार हे तीन आरोपी फरार आहेत.

अमरावतीत अवैध गावठी दारूवर छापा टाकण्यात आला.

हेही वाचा -कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच; सरकारची कबुली

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि १ आर.सी.पी. पथक यांचा समावेश होता. बऱ्याच वर्षानंतर चांदूर रेल्वे तालुक्यात एवढी मोठी दारूवर कारवाई करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details