अमरावती- चिखलदरा तालुक्यातील कोयलारी गावाजवळ एका भल्या मोठ्या अजगराने शेळीला विळखा घालून तिचा फडशा पाडला. गावकऱ्यांनी आणि वनविभागाने शेळीला अजगराच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत अजगराने शेळीला ठार केले होते.
VIDEO : चिखलदऱ्यात अजगराने पाडला शेळीचा फडशा
अजगराने शेळीला घातलेला विळखा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. ही घटना अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे.
कोयलारी गावातील एक महिला शेळ्या चारण्याकरिता रानात गेली होती. परंतु, घरी परतल्यानंतर तिला एक शेळी कमी असल्याचे समजले. त्यामुळे शेळीचा शोध घेण्यासाठी ती महिला पुन्हा जंगलात गेली. शेळीचा शोध घेत असताना एका भल्या मोठ्या अजगराने शेळीला विळखा घालून ठार केल्याचे आढळून आले. गावकऱ्यांनी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेळीला अजगराच्या विळख्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला वाचविण्यात त्यांना यश आले नाही. त्यांनतर वनविभागाने अजगराला पकडून जंगलात सोडले.
गावाजवळ अजगर आढळल्याने गावकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अजगराने शेळीला घातलेला विळखा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. ही घटना अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे.