अमरावती- मागील काही वर्षांपासून राज्यात तंबाखू व गुटखा खाल्याने तोंडाच्या कर्करोगाचा आजार मोठया प्रमाणावर वाढत आहे. एन तारुण्यातील मूले हे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत असल्याची गंभीर बाब देखील समोर आली आहे. त्यामुळे या नशेखोरीला आळा बसावा म्हणून अमरावतीमधील शिक्षिका दिपाली बाभूळकर या गेल्या अनेक वर्षोपासून व्यसनमुक्तीसाठी झटत आहे. दीपाली बाभूळकर या टीवल्या बावल्यांच्या माध्यमातून व तंबाखू खाल्याने होणारे शारीरिक नुकसान कसे होते याचे महत्व त्या लोकांना पटवून देत आहे. आज जागतिक तंबाखू मुक्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या टीवल्या बावल्याच्या नाट्याच्या माध्यमातून समाजात जनजागृती केली आहे.
जागतिक तंबाखू मुक्ती दिन; टीवल्या बावल्यांच्या माध्यमातून तंबाखू व्यवसनमुक्तीसाठी जनजागृती - Public Awareness for Tobacco Addiction
कोरोना महामारीचा काळ असतानादेखील बेजबाबदार लोक तोंडाचा मास्क काढून रस्त्यावर जेव्हा गुटखा, तंबाखू खाऊन थुंकतात तेव्हा मन विषण होत. त्यामुळे ही पिढी नेमकी कुठं जात आहे, असा सवाल देखील मनात उपस्थित होतो.
अमरावतीमधील जिल्हा शिक्षण व परीक्षण संस्था अमरावतीमध्ये विषय सहाय्यक म्हणून दीपाली बाभूळकर काम करतात. या बहुल्याच्या नाट्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी व शिक्षकामध्ये स्त्री पुरुष समानता, पर्यावरण संरक्षण, गुड टच, बॅड टच सारखे अनेक सामाजिक विषय त्या पोहचवत असतात. त्यांच्या या कार्यात कोरोना काळातही त्यांनी ऑनलाइन पध्दतीने कार्यक्रम करत आपल्या कार्यात खंड पडू दिला नाही. गुटखा, सिगारेट, तंबाखू, चैनीचे पदार्थ हे शरीरासाठी हानिकारक असल्याचं त्या लोकांना वारंवार सांगत असतात.
लोकांनी व पालकांनी याला प्रतिसाद देणे गरजेचे
कोरोना महामारीचा काळ असताना देखील बेजबाबदार लोक तोंडाचा मास्क काढून रस्त्यावर जेव्हा गुटखा, तंबाखू खाऊन थुंकतात तेव्हा मन विषण होत. त्यामुळे ही पिढी नेमकी कुठं जात आहे, असा सवाल देखील मनात उपस्थित होत असल्याची खंत दीपाली बाबुळकर यांनी व्यक्त केली. मी एक शिक्षिका म्हणून व्यसनमुक्तीसाठी शेवटपर्यंत झटण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे लोकांनी व पालकांनी देखील याला प्रतिसाद देऊन तंबाखू, गुटखा सोडला पाहिजे, असे मत दीपाली यांनी व्यक्त केले आहे.
३५० पेक्षा जास्त शाळा महाविद्यालयात टीवल्या बावल्याचे नाट्य
दीपाली यांनी आतापर्यंत राज्यभरातील तबल ३५० पेक्षा जास्त शाळा व महाविद्यालयात जाऊन त्यांनी व्यसनमुक्तीसाठी टीवल्या बावल्याचे नाट्य प्रयोग केले आहे. या माध्यमातून त्यांनी लाखो विद्यार्थी व हजारो पालकांध्ये जनजागृती केली आहे. शिक्षक वारीच्या माध्यमातून ५० हजार शिक्षकापर्यंत त्यांनी त्यांचा संदेश पोहचवला आहे. तसेच २८ देशांमध्ये कॉन्फरन्सिंगद्वारे देखील त्यांनी हा संदेश पोहचवला आहे.