अमरावती - आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यातील धामणगावरेल्वे शहरात एकतर्फी प्रेम प्रकरणातून एका तरुणीची चाकूने भोसकून हत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच दोन दिवसानंतर एका नराधमाने सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही धक्कादायक घटनामधील आरोपींना तत्काळ कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज धामणगाव रेल्वे शहर बंद करुन निषेध रॅली काढण्यात आली.
'या' घटनांच्या निषेधार्थ धामणगावरेल्वे बंद; निषेध मोर्चाचेही आयोजन - अमरावती मोर्चा बातमी
जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेमध्ये एकतर्फी प्रेम प्रकरणातून एका महाविद्यालयीन तरुणीची हत्या करुन तरुणाने स्वत:च्या पोटात चाकूने वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर आता अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे.
हेही वाचा-शबरीमला प्रकरण : पुनर्विचार याचिकेवर आजपासून सुनावणी
जिल्ह्यातील धामणगावरेल्वेमध्ये एकतर्फी प्रेम प्रकरणातून एका महाविद्यालयीन तरुणीची हत्या करुन तरुणाने स्वत:च्या पोटात चाकूने वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला. ही धक्कादायक घटना धामणगाव रेल्वे शहरात आठ दिवसापूर्वी घडली होती. या घटनेनंतर दोन दिवसांनी एका सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाला. दरम्यान, या दोन्ही घटनातील आरोपींना तत्काळ शिक्षा व्हावी, यासाठी आज धामणगाव रेल्वे शहर बंद ठेऊन निषेध रॅली काढण्यात आली. यामध्ये शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. तर शहरातील महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी या निषेध रॅलीत सहभागी झाले होते.