अमरावती - जगातील तिसऱ्या आणि भारतातील पहिला काचेचा स्कायवॉक हा विदर्भाचे काश्मीर असलेल्या अमरावतीच्या चिखलदरा येथे साकारला जात आहे. या स्कायवॉकचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. आता काम अंतीम टप्यात आल्याने दरीवरून केबक टाकणे बाकी आहे. परंतु हा भाग व्याघ्र प्राण्यांच्या अधिवसाचा येत असल्याचे कारण देत या कामाला केंद्र सरकारच्या वनमंत्रालयाने परवानगी नाकारली आहे. या विरोधात युवक कॉंग्रेस आक्रमक झाली असून चिखलदऱ्यातील स्कायवॉक जवळ युवक काँग्रेसच्यावतीने 'सद्बुद्धी महायज्ञ' करून केंद्र सरकार आणि वन मंत्रालयाचा निषेध करण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकारने तत्काळ याला परवानगी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारादेखील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
केंद्र सरकारचे स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफला पत्र -
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने नॅशनल आणि स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफला यासंदर्भात एक पत्र लिहिले होते. या परिसरात घनदाट जंगल असून वन्यप्राण्यांचा अधिवास आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उच्च दर्जाचे संवर्धन आणि संरक्षणाची आवश्यकता आहे. नॅशनल आणि स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफला प्रस्ताव सादर करण्याचे केंद्र सरकारने दिले होते. त्यासोबतच प्रोजेक्ट्चा इकोलॉजिकल स्टडी करा आणि त्याचा त्यावर काही परिणाम होतो का, त्या प्रोजेक्टचा वाईल्ड लाईफवर काही परिणाम होतो का, हे ही तपासा असेही केंद्र सरकारच्या पत्रात नमूद करण्यात आले होते.
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात मिळाली होती मान्यता -