अमरावती- येथील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी प्रचारासाठी विलासनगर प्रभागात पदयात्रा काढली. यावेळी एका चौकात काही तरुणांनी सुनील देशमुख यांचा निषेध केला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अमरावतीत युतीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुखांचा पदयात्रा दरम्यान निषेध; प्रचाराचे फाडले पोस्टर - सुनील देशमुख बातमी
शनिवारी सकाळी डॉ. सुनील देशमुख यांची परिसरात पदयात्रा निघाली होती. त्यादरम्यान काही संतप्त युवकांनी डॉ. सुनील देशमुख यांच्या प्रचारासाठी लागलेले पोस्टर फाडून टाकले. डॉ. सुनील देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषणाही दिल्या. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा-'भाजप-सेनेचे राजकारण जाती-धर्माच्या नावाने जनतेत दुफळी निर्माण करणारे'
विलासनगर प्रभाग हा महापौर संजय नरवणे यांचा प्रभाग आहे. शनिवारी सकाळी डॉ. सुनील देशमुख यांची पदयात्रा या परिसरात निघाली होती. काही संतप्त युवकांनी डॉ. सुनील देशमुख यांच्या प्रचारासाठी लागलेले पोस्टर फाडून टाकले. डॉ. सुनील देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषणाही दिल्या. महापौर संजय नरवणे यांनी या तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त तरुणांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. अखेर या परिसरात अधिक वेळ न थांबता डॉ. सुनील देशमुख यांची पदयात्रा समोर निघून गेली. या प्रकारामुळे विलास नगर परिसरात बराचवेळ तणाव निर्माण झाला होता.