अमरावती -अमरावती जिल्ह्यात अंजनगाव बारी येथे रवींद्र मेटकर हे शेतकरी आज दिवसाला एक लाख वीस हजार अंड्यांचे उत्पादन ( Production of one lakh and twenty thousand eggs per day ) घेत आहेत. अंड्यांचे विक्रमी उत्पादन विक्रमी उत्पादन घेणारे रवींद्र मेटकर हे विदर्भातील एकमेव पोल्ट्री फार्म व्यवसाय असून त्यांचा पर्यावरण पूरक असणारा मातोश्री पोल्ट्री फार्म हा विदर्भातील सर्वात अत्याधुनिक असणारा पोल्ट्री फार्म आहे. रवींद्र मेटकर यांनी शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलेल्या पोल्ट्री फार्म च्या व्यवसायाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून त्यांना कृषी क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहे. शेतीला असणाऱ्या जोडधंदाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता मिळविण्याचा आदर्शच जणू रवींद्र मेटकर यांनी आपल्या पोल्ट्री फार्म व्यवसायाद्वारे विदर्भातील शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.
असा आहे अत्याधुनिक पोल्ट्री फार्म - गत 37 वर्षांपासून कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणारे रवींद्र मेटकर यांनी यावर्षी ऑगस्ट महिन्यात अमरावती ते अंजनगाव बारी मार्गावर आपल्या शेतामध्ये अत्याधुनिक असा पोल्ट्री फार्म उभारला आहे. स्वयंचलित असणाऱ्या उपकरणांनी हा पोल्ट्री फार्म सज्ज ( poultry farm equipped with automatic equipment ) आहे. 30 हजार 500 कोंबड्या या ठिकाणी असून या ठिकाणी केवळ एक बटन दाबल्यावर या कोंबड्यांना मशीन द्वारे खाद्य पुरविले जाते. तसेच कोंबड्यांची विष्ठा देखील स्वयंचलित यंत्रणेद्वारे अत्याधुनिक शेड मधून बाहेर काढली जाते. कोंबड्यांनी दिलेली अंडी सुद्धा स्वयंचलित पद्धतीने एका ठिकाणी जमा होतात. या केंद्रात केवळ दोन महिलांच्या साह्याने एका ठिकाणी जमा जमा होणारे हे सर्व अंडे ट्रे मध्ये भरल्या जातात. या कोंबड्यांच्या शेडमध्ये योग्य तापमान राखण्यासाठी वातानुकूलित यंत्रणेची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छ वातावरणात या पोल्ट्री फार्म मध्ये सर्व कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहते सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व सुविधेमुळे या कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता तीन ते चार टक्के अधिक राहते अशी माहिती रवींद्र मेटकरी यांनी ' ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
मध्य प्रदेशात अंड्यांना मोठी मागणी -अंड्यांची विक्री करण्यासाठी आम्हाला फारसा त्रास होत नाही. आमच्या पोल्ट्री फार्म वरूनच सर्व अंडी खपली जातात. मध्य प्रदेशातील भोपाळ, खंडवा, बऱ्हाणपूर ,इंदोर ,झांसी या शहरांमध्ये आमच्या पोल्ट्री फार्म ची अंडी जातात. यासह गुजरातच्या सुरत शहरात देखील आमच्या इथून अंडी नियमित जात असल्याची माहिती रवींद्र मेटकरी यांनी दिली.