अमरावती : राज्यात कुपोषणाला आळा घालण्यासाठी, तसेच बालमृत्यू, मातामृत्यूंचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ‘टास्क फोर्स’च्या अध्यक्षपदी माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गाभा समितीचे सदस्य अॅड. बंड्या साने यांनी डॉ. दीपक सावंत यांना लिहिलेल्या पत्रात दायींच्या व्यथा मांडल्या आहेत.
अशी आहे दईंची व्यथा: मातांचे बाळंतपण सुरक्षित होण्याचे दृष्टीने तसेच नवजात अर्भकांची योग्य काळजी घेण्याची दृष्टीने उपकेंद्राच्या ठिकाणी परिसरातील प्रशिक्षित व अप्रशिक्षित दाईंची त्रैमासिक बैठक घेऊन प्रशिक्षण दिले जाते. पुर्वी दाईंना 'दाई किट' ( प्रसुती दरम्यान लागणारे साहित्य ) मिळत होते. दाई बैठक योजनेतून काही वर्षांआधी ४० रुपये तीन महिन्यातून एकदा मिळत होते. उच्च न्यायालयात सुरू असलेल्या जनहित याचिकेमुळे आता तीन महिन्यातून एकदा १०० रुपये भत्ता मिळतो. तर काही ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून मेळघाट मधील दाईला नियमित १०० रुपये देवू शकलो नाही, अशी खंत अॅड. साने यांनी व्यक्त केली आहे.