अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या सर्व शाखांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. मात्र विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी प्रचंड अडथळ्याची शर्यंत पार करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी देण्यात आलेले आयडी आणि पासवर्ड ऐनवेळी उघडत नसल्याने, संतप्त विद्यार्थी विद्यापीठात धडकले. त्यानंतर विद्यापीठाने आता महाविद्यालयांना ऑफलाईन परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ऐनवेळी ऑफलाईन परीक्षा कशी घ्यायची, असा प्रश्न महाविद्यालयांना पडला आहे.
अमरावती विद्यापीठाचा ऑनलाईन परीक्षेत गोंधळ, संप्तत विद्यार्थी धडकले विद्यापीठात - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या सर्व शाखांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धनीने घेण्यात येत आहे. मात्र विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी प्रचंड अडथाळ्याची शर्यंत पार करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी देण्यात आलेले आयडी आणि पासवर्ड ऐनवेळी उघडत नसल्याने, संतप्त विद्यार्थी विद्यापीठात धडकले आहेत.
![अमरावती विद्यापीठाचा ऑनलाईन परीक्षेत गोंधळ, संप्तत विद्यार्थी धडकले विद्यापीठात Amravati University](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9245128-15-9245128-1603190249217.jpg)
दरम्यान विद्यापीठाने यापूर्वी जाहीर केलेली परीक्षा दोनवेळा रद्द करण्यात आली होती. आज अखेर परीक्षेला सुरुवात झाली, मात्र ऑनलाईन परीक्षेत अडथळा निर्माण झाल्याने परीक्षा ऑफलाईन घेण्याचे आदेश विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत. आज पाचपर्यंत विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षेची सोय करा, असे या आदेशात म्हटले आहे. मात्र ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी अनेक महाविद्यालयांनी विरोध केला असून, ग्रामीण भागात असणारा विद्यार्थी असा ऐनवेळी ऑफलाईन परीक्षा द्यायला अमरावतीत किंवा अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यातील महाविद्यालयात कसा पोहोचणार असा सवाल उपस्थित होत आहे.