अमरावती- जिल्ह्यातील खानापूर ते मोर्शी रोडवर मधापुरी हनुमान मंदिराजवळ खासगी बस पलटली. या अपघातात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. तर २५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
अमरावतीत खासगी बस पलटली; १ ठार, २५ पेक्षा अधिक जखमी
अमरावती जिल्ह्यातील खानापूर ते मोर्शी रोडवर मधापुरी हनुमान मंदिराजवळ खासगी बस पलटली. या अपघातात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. तर २५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
अमरावतीत खासगी बस पलटली
जिल्ह्यातील परतवाडा येथील श्रीराम ट्रॅव्हल कंपनीची बस आज अंजनगाव सुर्जीवरून मध्यप्रदेशमधील पांढुरना येथे जात होती. दरम्यान, साडेअकरा वाजताच्या सुमारास खानापूर ते मोर्शी रोडवर मधापुरी हनुमान मंदिराजवळ ही बस पलटली. या अपघातात बसमधील एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.
जखमी प्रवाशांना मोर्शी ग्रामीण रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
Last Updated : Jun 15, 2019, 2:38 PM IST