महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासगी बँका मेळघाटमध्ये सेवा देऊ शकतात का? युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचा सवाल

राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण होऊ नये यासाठी राज्यभर बँकांनी युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनच्या माध्यमातून दोन दिवसांचा बंद पुकारला आहे.

melghat
मेळघाट

By

Published : Mar 16, 2021, 8:03 PM IST

Updated : Mar 16, 2021, 8:13 PM IST

अमरावती -राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण होऊ नये यासाठी राज्यभर बँकांनी युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनच्या माध्यमातून दोन दिवसांचा बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना सेवा मिळावी यासाठी राष्ट्रीय बँका दुर्गम भागातही पोहचल्या आहेत. या राष्ट्रीय बँकांचे खासगीकरण झाले तर सेवेपेक्षा आपल्या फायद्याला बँक महत्व देईल. अशा परिस्थितीत कोणती खासगी बँक मेळघाटसारख्या भागात सेवा देईल का? असा प्रश्न युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या अमरावती युनिटचे संयोजक सुभाष सांमदेकर

हेही वाचा -...तर संघर्ष अटळ! वीज बिलाच्या मुद्द्यावरून उदयनराजेंचा इशारा

दोन दिवस बँक बंद

संसदेच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशातील 9 पैकी 2 राष्ट्रीय बँकांचे खासगीकरण केले जाणार आल्याचे जाहीर करण्यात आले. या दोन बँका कोणत्या हे अद्याप स्पष्ट नसले तरी हे राष्ट्रीय बँकांवर आलेले संकट असून या निर्याविराधात आम्ही आंदोलन केले असून बँक दोन दिवस बंद ठेवल्या असोयाचे युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनचे अमरावती युनिट संयोजक सुभाष सामदेकर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

या आहेत मागण्या

बँकांचे खासगीकरण थांबवा.
सार्वजनिक क्षेत्रात बँक मजबूत करा.
थकीत कर्ज वसूल करा.
सर्वसामन्यांनाचा पैसा सुरक्षित राहावा याचा विचार व्हावा.
खासगी बँक बुडल्या तर अनेकांचे आयुष्य बरबाद होईल याचा विचार व्हावा.
खासगी बँक केवळ उद्यगपत्यांच्या हिताची असेल त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या विचार करावा.

हेही वाचा -महाविकास आघाडीविरोधात भाजपचे सोशल वॉर! गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Last Updated : Mar 16, 2021, 8:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details