अमरावती- जिल्ह्यातील मेळघाटात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चिखलदरा तालुक्यातील सलोना प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत बोराळा येथील गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. मांगली सुभाष भुसुम असे मृत महिलेचे नाव आहे.
अमरावतीच्या मेळघाटात एका गर्भवती मातेचा मृत्यू - मेळघाटात महिलेचा मृत्यू
मेळघाटात माता मृत्यू, बाल मृत्यू आणि कुपोषणाची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. मृत मांगली सुभाष भुसुम ही महिला आठ महिन्यांची गर्भवती होती. बोराळा उपकेंद्राअंतर्गत या महिलेची नोंद होती.
मेळघाटात माता मृत्यू, बाल मृत्यू आणि कुपोषणाची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. मृत मांगली सुभाष भुसुम ही महिला आठ महिन्यांची गर्भवती होती. बोराळा उपकेंद्राअंतर्गत या महिलेची नोंद होती. येथील स्थानिक वैद्यकिय अधिकारी डाॅ. पाचबोले, आरोग्य सेविका डी. एच. शिंदे यांच्यासह अंगणवाडी सेविकेच्या देखरेखीत गर्भवतीस आरोग्य सेवा देणे सुरू होते. १६ जुनला अचानक या महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला अचलपुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारानंतर दुसऱ्या दिवशी घरी पोहोचल्यानंतर या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. नातेवाईकांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.