महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भरचौकात महिलेची प्रसुती; रुग्णवाहिकेअभावी सायकल रिक्षातून नेल्याने मृत्यू - amravati latest news

अमरावतीमधील मोर्शी येथे शासकीय रुग्णालयाच्या ढिसाळ यंत्रणेमुळे गर्भवती महिलेचा बळी गेला आहे. रुग्णवाहिकेचा अभावामुळे महिलेचा भरचौकात प्रसुती करावी लागली आहे.

रुग्णवाहिकेअभावी मालवाहू रिक्षातून नेल्याने मृत्यू

By

Published : Sep 20, 2019, 5:07 PM IST

Updated : Sep 20, 2019, 6:57 PM IST

अमरावती -जिल्ह्यातील मोर्शी येथे एका गर्भवती महिलेची भर चौकात उघड्यावर प्रसुती करण्यात आली. एवढेच नाहीतर तिला प्रसुतीनंतर सायकल रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आले. वेळेवर उपचार आणि रुग्णवाहिका न मिळाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला.

आईसोबत भांडण करुन घर सोडलेल्या तरुणीवर मदतीच्या बहाण्याने बलात्कार

आशा परशुराम बारस्कर (35), असे मृत महिलेचे नाव आहे. ती वरुड तालुक्यातील जरुड येथील रहिवासी आहे. तिला प्रसुती कळा सुरू झाल्यामुळे वरुड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून अमरावतीला नेण्यास सांगितले. मात्र, तिला रुग्णावाहिका मिळाली नाही. शेवटी ती आणि तिचा पती एस. टी. बसने मोर्शीला गेले. प्रसुती वेदना वाढल्याने एसटी वाहकाने तिला मोर्शीच्या जयस्तंभ चौकात उतरवले. तिला प्रचंड त्रास होत होता. तेवढ्यात चौकात असलेले उपजिल्हा रुग्णालयाच्या सल्लागार समितीचे सद्स्य कमर अली लियाकत अली यांनी तत्काळ रुग्णालयातील आया कमलाबाईला जयस्तंभ चौकात आणले. त्यानंतर भररस्त्यात त्या महिलेची प्रसुती करण्यात आली. तिच्या अवहेलना एवढ्यावरच थांबल्या नाही, तर तिला रुग्णालयात नेण्यासाठी साधी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. शेवटी एका सायकल रिक्षात घालून तिला मोर्शीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला अमरावतीला पाठवण्यात आले. मात्र, रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

नागपुरात १ महिन्याच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या ; कारण अस्पष्ट

राज्याचे कृषी मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याच मतदार संघात ही घटना घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणा आणि ढिसाळ यंत्रणेमुळे या महिलेचा बळी गेला. त्यामुळे तिचा मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तिचे नातेवाईक करीत आहे.

Last Updated : Sep 20, 2019, 6:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details