महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बडनेरा विधानसभा मतदारसंघात प्रिती बंड शिवसेनेच्या उमेदवार; अफवा आणि चर्चांना पूर्णविराम

सोमवारी दिवसभर बडनेरा मतदार संघात विद्यमान आमदार रवी राणा यांना भाजप आणि शिवसेनेचा पाठिंबा मिळणार असल्याची अफवा पसरविली जात असताना संध्याकाळी प्रिती संजय बंड यांना एबी फॉर्म देऊन शिवसेनेने त्यांची बडनेरा मतदारसंघातून अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर केली आहे.

बडनेरा विधानसभा मतदारसंघात प्रीती बंड शिवसेनेच्या उमेदवार; अफवा आणि चर्चांना पूर्णविराम

By

Published : Oct 1, 2019, 5:08 AM IST

अमरावती - जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बडनेरा मतदार संघात यावेळी भाजप शिवसेना युतीचा उमेदवार कोण असेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. विशेष म्हणजे सोमवारी सकाळपासून सोशल मीडियावर भाजप आणि शिवसेनेचा पाठिंबा आमदार रवी राणा यांना घोषित झाल्याचे मेसेज वेगाने पसरविण्यात आले होते. खुद्द आमदार रवी राणा हे सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून मला भाजप-शिवसेनेचा पाठिंबा राहील असे सांगत होते.

बडनेरा विधानसभा मतदारसंघात प्रीती बंड शिवसेनेच्या उमेदवार; अफवा आणि चर्चांना पूर्णविराम

हे ही वाचा -रोहित पवारांबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आमदार रवी राणा यांना भाजप आणि शिवसेना युतीचा पाठिंबा मिळाला असल्याची माहिती रवी राणा समर्थकांकडून सोशल मीडियावर पसरविण्यात आली. काहींनी तर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना फोन करून प्रीती बंड यांना तिवसा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असून बडनेरा मतदार संघात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे समर्थन अपक्ष आमदार रवी राणा यांना असणार असल्याचे निश्चित झाले आहे. असे सांगण्यास सुरूवात केली होती.
दरम्यान, संध्याकाळी सहा वाजता बडनेरा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी शिवसेनेने प्रीती बंड यांना ए.बी फॉर्म दिला अशी अधिकृत माहिती समोर येताच शिवसैनिकांनी जल्लोष केला. दिवसभर सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांनी आपले पितळ उघडे पडताच अनेकांनी आपल्या पोस्ट डिलीट केल्या.

हे ही वाचा -'अजित पवारांचा राजीनामा हे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण'

ABOUT THE AUTHOR

...view details