महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण; प्रशासनातर्फे फवारणी - amravati district hospital

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात सर्व पातळीवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.

corona in amravati
महापालिकेच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.

By

Published : Mar 30, 2020, 10:55 PM IST

अमरावती - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात सर्व पातळीवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली.

महापालिकेच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.
पालिकेच्या अग्निशामक विभागाच्या खास वाहनाद्वारे निर्जंतुकिकरण पार पडले. रुग्णालयातील बाह्य रुग्ण सेवा विभाग, सायकल स्टँड परिसर अशा सर्वच भागात निर्जंतुकिकरण झाले.

यावेळी महापौर संजय नरवणे, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, उपमहापौर कुसुम साहू, स्थायी समिती सभापती राधा कुरील यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालयासह, जिल्हा महिला रुग्णालय व शहरातील सर्व शासकीय आणि महापालिकेच्या रुग्णालयातही निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केली जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details