अमरावती- अमरावतीच्या तिवसा मतदार संघाच्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या विरोधात माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांना निवडणूक लढवण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनीच दिल्याची माहिती आहे. प्रवीण पोटे यांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिला असला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाच्या चर्चेला त्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत तिवसा मतदार संघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर विरुद्ध भाजपचे प्रविण पोटे असा सामना रंगणार आहे.
हेही वाचा -कृषीमंत्री अनिल बोंडे आणि पूरग्रस्त ग्रामस्थांमध्ये खडाजंगी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 10-15 वर्षांपासून जे पारंपरिक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्या मतदारसंघात काँग्रेसला शह देऊन तिथे भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघ हा मागील गेल्या 10 वर्षांपासून काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या ताब्यात आहे.