अमरावती - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीचे निकाल आज ऑनलाईन -जाहीर झाले. यामध्ये अमरावती विभागात ज्ञानमाता हायस्कुलचा विद्यार्थी प्रणय राहुल शर्मा याने पहिला क्रमांक पटकावला आहे. प्रणयला ९९.२० टक्के गुण मिळाले आहेत.
प्रणय शर्माला दहावीत ९९.२० टक्के गुण; अमरावती विभागात पहिला - highschool
अमरावती विभागात ज्ञानमाता हायस्कुलचा विद्यार्थी प्रणय राहुल शर्मा याने पहिला क्रमांक पटकावला आहे. प्रणयला ९९.२० टक्के गुण मिळाले आहेत. प्रणायला इंग्रजी विषयात ९३ गुण मिळाले असून, संस्कृतमध्ये ९९, मराठीत ८७, गणितात ९९ विज्ञानमध्ये ९८ आणि सामान्य विज्ञानमध्ये ९५ गुण मिळाले आहेत.
प्रणायला इंग्रजी विषयात ९३ गुण मिळाले असून, संस्कृतमध्ये ९९, मराठीत ८७, गणितात ९९ विज्ञानमध्ये ९८ आणि सामान्य विज्ञानमध्ये ९५ गुण मिळाले आहेत. शिक्षणाधिकारी नीलिमा टाक, ज्ञानमाता हायस्कुलचे मख्याध्यापक जोस लिन यांनी रुख्मिनी नगर येथे प्रणयच्या घरी जाऊन त्याचा सत्कार केला.
यावेळी प्रणयची आई रश्मी, वडील राहुल, बहीण साक्षी, भाऊ वेदांत यांच्यासह आजी, आजीबा काका, काकू उपस्थित होते. भविष्यात आयआयटी करायचे असल्याचे प्रणय म्हणाला. प्रणय आपल्या यशाचे श्रेय आई, वडील आणि शाळेतील शिक्षकांना दिले आहे.