महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाळासाहेब आंबेडकरांबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकल्याने वृद्धास भाजपच्या नगरसेवकाची मारहाण

प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकल्याने कार्यकर्त्यांनी वृद्धास मारहाण केली. हा प्रकार अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे घडला.

प्रकाश आंबेडकरांबद्धल वादग्रस्त पोस्ट टाकल्याने वृद्धास मारहाण

By

Published : Apr 20, 2019, 9:00 PM IST

Updated : Apr 20, 2019, 11:18 PM IST

अमरावती- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकल्याने भाजपच्या नगरसेवकाने वृद्धास मारहाण केली. हा प्रकार अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे घडला. भाई रजनिकांत असे मारहाण करण्यात आलेल्या वृद्धाचे नाव आहे. तर संतोष कोल्हे असे भाजपच्या नगरसेवकाचे नाव आहे.

प्रकाश आंबेडकरांबद्धल वादग्रस्त पोस्ट टाकल्याने वृद्धास मारहाण

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकरांबाबत अकोला येथील भाई रजनिकांत यांनी व्हॉट्सअॅपवर वादग्रस्त पोस्ट टाकली होती.

दरम्यान, आज रजनिकांत हे दर्यापूर येथे कामानिमित्त आले होते. यावेळी दर्यापूरमधील भाजपचे नगरसेवक संतोष कोल्हे यांनी बसस्थानकासमोर २-३ व्यक्तींसोबत मिळून रजनिकांत यांना मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांनी सांगितले, की आम्ही संतोष कोल्हे याला २०१७ साली जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकीत पक्षाला मतदान न केल्याने निलंबीत केले आहे. त्यामुळे ते सध्या भाजपचे नगरसेवक नसल्याचे दिनेश यांनी स्पष्ट केले आहे.

Last Updated : Apr 20, 2019, 11:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details