अमरावती- दर्यापूर तालुक्यातील येवदा गावातील विविध नागरी समस्यांचा निपटारा करण्याची मागणी करत दर्यापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदलाल धारगे यांच्या दालनात प्रहारने 'शिदोरी' आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी विस्तार अधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर काढली. येवदा ग्रामपंचायती विरोधात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहारच्या वतीने देण्यात आला आहे.
दर्यापुरात प्रहारचे 'शिदोरी' आंदोलन, विस्तार अधिकाऱ्यांची खुर्ची काढली बाहेर - अमरावती जिल्हा बातमी
येवदा गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कोणत्याही प्रकारचे प्रतिउत्तर गेल्या 2 वर्षांपासून मिळाले नसल्याने प्रहारने हे आंदोलन छेडले.
हेही वाचा - अमरावतीत संत्री चोरी करणारी टोळी जेरबंद; 11 लाखांचा माल जप्त
येवदा गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कोणत्याही प्रकारचे प्रतिउत्तर गेल्या 2 वर्षांपासून मिळाले नसल्याने प्रहारने आंदोलन छेडले. प्रशासनाच्या विरोधात प्रहार संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्या दालनात चर्चा करण्यात आली. यावेळी कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर विस्तार न मिळाल्याने हे आंदोलन तीव्र करण्यात आले.