अमरावती : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक (Graduate and Teacher Constituency Election) जाहीर झाली आहे. नाशिक, अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची देखील निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे या आगामी निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, cयांच्या प्रहार पक्षाने पदवीधर व शिक्षक मतदार संघात उडी घेतली आहे. आगामी 30 जानेवारीला होणाऱ्या विधान परिषदेतील पाच जागेच्या निवडणूकीसाठी (Legislative Council election) प्रहार जनशक्ती पक्ष मैदानात उतरला आहे.
प्रहारचे पाच उमेदवार रिंगणात : पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी ती येत्या 30 जानेवारीला निवडणूक होत आहे. त्यासाठी विविध पक्ष तसेच संघटनांनी आपापल्या पद्धतीने तयारी सुरू केली आहे. प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यात प्रहार शिक्षक संघटना व मेस्टाचे पाच उमेदवार जाहीर केले आहे. यामध्ये अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी किरण चौधरी, मराठवाडा औरंगाबाद शिक्षक मतदार संघ डॉ. संजय तायडे, कोकण विभाग नरेश कोंडा आणि नाशिक विभागासाठी एडवोकेट प्रा. सुभाष जंगले अशी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये प्रहारचे दोन तर मेस्टाचे तीन उमेदवार आहेत.