अमरावती :महाराष्ट्रात सध्या सत्ता संघर्षावरून घमासान चालू असताना इकडे मात्र मोर्शिचे आमदार देवेंद्र भुयार यांनी अतिशय घरगुती सोहळ्यात साखरपुडा आटोपला आहे. लवकरच ते विवाह बंधनात अडकणार आहेत. शेतकरी संघटनेत दहा वर्ष काम करणारे देवेंद्र भुयार यांनी मोर्शी मतदारसंघात कृषी मंत्री असणारे डॉक्टर अनिल बोंडे यांचा पराभव करून मोठा विजय मिळवला होता. कृषिमंत्री यांचा पराभव करून आमदार झालेल्या देवेंद्र भुयार यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली होती. आमदार झाल्यावर शेतकरी संघटनेत विशेष लक्ष देत नसल्यामुळे भुयार यांची शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी त्यांना पक्षातून काढले होते.
MLA Devendra Bhuyar : राज्यात सत्तेच्या बोहल्यावर चढण्यासाठी रस्सीखेच; पण हे आमदार साक्षगंधात मग्न...
महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष ( Maharashtra Political Crisis ) शिगेला पोचला आहे. सरकारचे काय होणार या बाबत क्षणा क्षणाला घडामोडी घडत (Power struggle in the state) आहेत.सत्तेच्या बोहल्यावर कोणाची वर्णी लागते की ठाकरेंची खुर्चि वाचते याचा निर्णय काही तासांवर आलेला असताना एक आमदार मात्र आयुश्याच्या बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाला आहे. राज्यातील आमदारांवर सगळ्यांचे लक्ष आहे पण हा आमदार साक्षगंधात मग्न ( But these MLA are engaged in Engagement ) असल्याचे समोर आले आहे.
यानंतर देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक साधली. विधान परिषद निवडणुकीत त्यांच्या मतदानाबाबत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आक्षेप व्यक्त केला असताना मी पवारांशी प्रामाणिक आहे असे म्हणत देवेंद्र भुयार यांनी खासदार संजय राऊत यांना देखील सडेतोड उत्तर दिले होते. आमदार देवेंद्र भुयार यांचा साखरपुडा नुकताच आटोपला असून लवकरच त्यांच्या लग्नाचा मुहूर्त ते जाहीर करणार आहेत. राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असली तरी भुयार यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र नवचैतन्य बहरले आहे.
हेही वाचा : Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक, शहरात शक्तिप्रदर्शन