अमरावती- शहर आणि जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे कडाक्याची थंडी ओसरली आहे. अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
अमरावती शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता - Farmer
अमरावतीत आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने परिसरात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
ढगाळ वातावरण
आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. अमरावती, चांदूर रेल्वे स्थानक या परिसरात पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आज पाऊस पडला तर गहू, हरबरा या शेतमालाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला होता आणि काही भागात गारपीटही झाली होती.