महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्मचाऱ्यांच्या अप-डाऊनमुळे चांदूर रेल्वेत कोरोनावाढीची शक्यता - corona proliferation in chandur railway

सर्व कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट करून मुख्यालयी राहण्याची सक्ती करा अन्यथा आंदोलनाचा इशारा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमेरचंद जैन यांच्या सहीच्या निवेदनातून देण्यात आला आहे.

corona proliferation in chandur railway
corona proliferation in chandur railway

By

Published : Mar 25, 2021, 4:55 PM IST

Updated : Mar 25, 2021, 5:28 PM IST

अमरावती - कोरोना महामारीत कोविड टेस्टसह इतर अनेक बंधणे व्यापाऱ्यांवर लावण्यात येत असल्यामुळे आता व्यापारी संघटनासुद्धा आक्रमक झाली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या अप-डाऊनमुळे चांदूर रेल्वेत कोरोनाचा प्रसार जास्त होण्याची शक्यता आता स्थानिक व्यापारी संघटनेने वर्तविली असून सर्व कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट करून मुख्यालयी राहण्याची सक्ती करा अन्यथा आंदोलनाचा इशारा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमेरचंद जैन यांच्या सहीच्या निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदन स्थानिक उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

'चांदूर रेल्वे येथे राहण्याची सक्ती करण्यात यावी'

कोरोना महामारीमध्ये प्रशासनातर्फे आता सर्व व्यापाऱ्यांना कोरोना टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आल्याचा नवीन आदेश काढण्यात आला. यासाठी चांदूर रेल्वेतील सर्व व्यापारी तयार आहेत. परंतु जे चांदूर रेल्वे तालुक्यात जवळपास ९० टक्के कर्मचारी अमरावती व इतर ठिकाणावर येणे-जाणे करतात, त्यांची टेस्ट प्रथम करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नगर परिषदचे कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी व इतर कार्यालयातील बरेच कर्मचारी अप-डाऊन करतात. त्यामुळे सर्व कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना सक्ती करण्यात यावी. तसेच तालुक्यातील सर्व कार्यालयातील कर्मचारी जे अप-डाऊन करतात त्यांना चांदूर रेल्वे येथे राहण्याची सक्ती करण्यात यावी व जोपर्यंत कोरोनाचा कहर सुरू आहे, तोपर्यंत त्यांचे येणे-जाणे बंद करण्यात यावे. बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कोरोनाचा शिरकाव शहरात मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, असे व्यापारी संघटनेने निवेदनातून म्हटले आहे.

'चाचणीची तारीख वाढवावी'

व्यापाऱ्यांना टेस्टिंग करण्याची तारीख ५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देतेवेळी राजू खांडपासोळे, राहुल जैन, पंकज केशरवानी, संजय जैन, अमोल गवळी, मदन कोठारी, गोपाळराव वाघ, सुनील मालखेडे, छोटू विश्वकर्मा यांसह अनेकांची उपस्थिती होती.

Last Updated : Mar 25, 2021, 5:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details