अमरावती -दिवाळी आली, की गरिबांना किराणा वाटणारे बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या घरासमोर शेकडो गरीब महिलांची गर्दी उसळली आहे. या महिला आम्हाला किराणा हवा आहे, आज किराणा मालाची अत्यंत गरज असून आम्हाला किराणा द्या, अशी मागणी आमदार रवी राणा यांच्याकडे करत आहेत.
'दिवाळीत जसा किराणा माल वाटता, तसा आज आम्हाला हवा आहे' - आमरावती लेटेस्ट न्यूज
आमदार रवी राणा यांच्या घरासमोर शेकडो गरीब महिलांनी किराणा माल देण्याची मागणी करत गर्दी केली होती. दिवाळीत तुम्ही जसा किराणा आम्हाला वाटता तसा किराणा आज आम्हाला हवा असल्याचे महिलांचे म्हणणे होते.
शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून शंकर नगर परिसरात आमदार रवी राणा यांच्या घरासमोर अमरावती शहरातील विविध झोपडपट्टी परिसरातील शेकडो महिलांची गर्दी उसळली. कोरोनामुळे काम बंद आहे. घरात किराणा माल नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. दिवाळीत तुम्ही जसा किराणा आम्हाला वाटता तसा किराणा आज आम्हाला हवा असल्याचे महिलांचे म्हणणे होते. दरम्यान, आमदार रवी राणा यांनी सध्या सर्व काही बंद आहे. हे असे होणार हे ठाऊक असते तर आधी व्यवस्था केली असती. मात्र, तुम्हाला शासकीय धान्य दुकानातून धान्य मिळेल. ज्यांच्याकडे रेशन दुकानाचे कार्ड नाही, त्यांना पण मी धान्य वितरित करायला सांगणार, अशा शब्दात सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. काही महिलांनी आम्हाला एक हजार रुपये तरी द्या, अशी मागणी केली. मात्र, राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वांची कशीबशी समजूत काढून सर्वांना आपापल्या घरी पाठवले.