अमरावती -विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळख असलेल्या अमरावतीमधील चिखलदरा येथे दरवर्षी पर्यटनासाठी हजारो पर्यटक राज्यभरातून येत असतात. परंतु चिखलदऱ्याला जाण्यासाठी असलेला मुख्य मार्ग परतवाडा- चिखलदरा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
चिखलदरा येथे दरवर्षी पर्यटक मोठया प्रमाणात येत असतात. सर्वाधिक पर्यटक हे परतवाडा या मार्गाने चिखलदरा येथे येत असतात. परंतु या मार्गाची दुर्दशा झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे. चिखलदऱ्यात येणाऱ्या पर्यटकांकडून दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल गोळा केला जातो. मात्र त्याच पर्यटकांना या रस्त्यावर आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
आधीच रस्ता अरुंद त्यात खड्डेच खड्डे