अमरावती -संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ( Sant Gadge Baba Amravati University ) सिनेटची निवडणूक ( Amravati University Senate Election) उद्या होणार आहे. या निवडणूकीत 'नुटा' पॅनलदवारे आपले उमेदवार उभे करण्यात आले आहे. 'नुटा'च्या सर्व उमेदवारांना शिक्षक महासंघा तर्फे पाठींबा जाहीर करण्यात आल्याची माहिती शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पाठिंबाबद्दल आश्चर्य व्यक्त -सिनेट निवडणुकीसाठी होणारे मतदान अवघ्या काही तासांवरच आले असताना शिक्षक महासंघाने नुटा या संघटनेला दिलेल्या पाठिंबाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विद्यमान आमदारांनी पदवीधरांसाठी किंवा इतर कुठल्याच घटकांसाठी काहीही काम केले नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शिक्षकांच्या हितासाठी गेल्या बऱ्याच काळापासून 'नुटा' झटत आहे. पदवीधरांचे प्रश्न, पदवी वितरण असेल विद्यार्थी त्यांच्या सर्व प्रश्नांसाठी नोटा कायम मैदानात असल्याची माहिती भैय्यासाहेब मेटकर यांनी यावेळी दिली.
पत्रपरिषदेला भैय्या साहेब मेटकर, प्रा. नितीन टाले, प्रा. जगदीश गोवर्धन हे शिक्षक महासंघाचे उमेदवार यावेळी उपस्थित होते.
सिनेटसाठी मतदान उद्या -एकूण 44 सदस्य संख्या असणाऱ्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्यांमध्ये महाविद्यालयीन प्राचार्यांची संख्या 10 असून, संस्थाचालक प्रतिनिधी ६, संचालक प्रतिनिधी 10, विद्यापीठ शिक्षक सात पदवीधर, नोंदणी सदस्य 10, विद्वत्त परिषद दोन, आणि परीक्षा मंडळाच्या तीन सदस्यांसाठी मतदारांना मतदान करावे लागणार आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी रविवार, २० नोव्हेबर रोजी अमरावती विभातातील पाचही जिल्ह्यात एकूण 63 मतदान केंद्रांवर मतदान प्रकिया राबविली जाणार आहे. नुटा, शिक्षण मंच, अभाविप, जस्टीस, शिवसेना, प्राचार्य फोरम पॅनलसह अपक्ष असे एकूण २०६ उमेदवार रिंगणात आहे.
निवडणुकीची तयारी पूर्ण -अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळ निवडणुकीसाठी अमरावतीसह अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ येथे ६३ मतदान केंद्र असणार आहे. एकूण सिनेटच्या ३७ जागांसाठी मतदान प्रक्रिया राबविली जात असल्याची माहिती कुलसचिव आणि निवडणूक अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांनी ' ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. रविवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार असल्याचेही कुलसचिव डॉ. तुषार
देशमुख यांनी सांगितले.