महाराष्ट्र

maharashtra

अमरावतीच्या सायकल मॅरेथॉनमध्ये खासदार नवनीत राणांनी चालवली सायकल

पालकमंत्री यशोमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा यांनी यावेळी सायकल चालवली. तसेच रॅलीतील सहभागी व्यक्तींशी दिलखुलास संवाद साधला.

By

Published : Jan 19, 2020, 6:17 PM IST

Published : Jan 19, 2020, 6:17 PM IST

Updated : Jan 19, 2020, 8:32 PM IST

cycle rally in Amravati
हिंदुस्थान पेट्रोलियम सायकल रॅली

अमरावती- पर्यावरण संवर्धनासाठी हिंदुस्थान पेट्रोलियमतर्फे शहरात सायकल रॅली काढण्यात आली. विभागीय क्रीडा संकुलात या रॅलीच्या समारोपप्रसंगी मान्यवरांनी सायकल चालवून उपस्थितांमध्ये उत्साह जागवला.

पालकमंत्री यशोमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा यांनी यावेळी सायकल चालवली. तसेच रॅलीतील सहभागी व्यक्तींशी दिलखुलास संवाद साधला. आमदार सुलभा खोडके, क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, हिंदुस्थान पेट्रोलियमचे नागपूर क्षेत्रीय प्रबंधक मुकुंद जवंजाळ, क्षेत्रीय विपणन अधिकारी विशाल सूर्यवंशी, विनोद साळुंखे आदी यावेळी उपस्थित होते.

सायकल मॅरेथॉनमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग

हेही वाचा - अमरावतीमध्ये 'पाणी वाचवा, स्वच्छता अभियान प्रदर्शनी' संपन्न

प्रदूषण रोखण्यासाठी निसर्ग आणि मन दोहोंची जपणूक करणे आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सायकल रॅलीसारखे उपक्रम सतत राबवले जावेत, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

पर्यावरण जपण्यासाठी 'अधिक सायकल, कमी मोटरसायकल' हा मंत्र अवलंबला पाहिजे, असे जलसंपदा राज्यमंत्री कडू यांनी सांगितले. खासदार श्रीमती राणा, आमदार श्रीमती खोडके यांनीही मनोगत व्यक्त केले. उपक्रमात विद्यार्थी, विद्यार्थिनी व युवकांसह ज्येष्ठांनीही सहभाग घेतला होता.

हेही वाचा - 'कायद्याच्या नावाखाली जातीयवाद वाढविण्याचा भाजपचा डाव'

Last Updated : Jan 19, 2020, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details