अमरावती- मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी गुरुवारी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह संपुर्ण जिल्हा हादरला आहे. मृत्यूपूर्वी दिपाली चव्हाण यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक रेड्डी यांच्या नावे लिहिलेल्या चार पानांच्या पत्राद्वारे वरिष्ठ वनअधिकारी विनोद शिवकुमार हेच दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्त्येस जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शिवकुमारला नागपुरातून अटक करण्यात आली आणि रेड्डींची नागपूरला बदली करण्यात आली. शिवकुमारला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर दीपाली चव्हाण यांचे अजून एक पत्र समोर आले त्यात त्यांनी मनिषा उईके नावाचा उल्लेख केला आहे. यामुळे या प्रकरणात नवीन ट्विस्ट आले आहे.
'मनीषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी नाही होणार!' दीपाली चव्हाण प्रकरणात नवीन ट्विस्ट
दीपाली यांनी मृत्यूपूर्वी आपले पती राजेश मोहिते यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. ते पत्र ईटीव्ही भारतच्या हाती लागले आहे. त्यामध्ये "मनीषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी होणार नाही तिने माझे आयुष्य बरबाद केले आहे", अशी ओळ लिहिलेली आहे. त्यामुळे आता मनिषा उईके ही कोण आहे? दीपाली चव्हाण यांनी तिचा उल्लेख का केला? तिने माझे आयुष्य बरबाद केले आहे, असे त्यांनी का लिहिले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शिवकुमार आणि दीपाली चव्हाण यांचा कॉल रेकॉर्ड आला समोर -
आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चार पानांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी वरिष्ठ वन अधिकारी विनोद शिवकुमार याला जबाबदार धरले. त्यामुळे पोलिसांनी शिवकुमारला अटक केली आहे. पोलीस तपासात उपवनरक्षक विनोद शिवकुमार आणि दीपाली चव्हाण यांचे फोन रेकॉर्ड समोर आले.
प्रकरण भाजपाने उचलून धरले -
दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पती, आई आणि अपर प्रधान उप वनसंरक्षकाच्या नावाने लिहिलेली आहेत. ही तिन्ही स्वतंत्र पत्रे नीट वाचली तर प्रत्येक पत्रात अपर प्रधान उपवन संरक्षक श्रीनिवास रेड्डी याचा उल्लेख आहे. झालेल्या सर्व प्रकरणाला तो देखील जबाबदार असल्याचे लक्षात येते. त्यामुळे दीपाली चव्हाण आत्महत्त्या प्रकरणात उपवनसंरक्षक शिवकुमार प्रमाणे रेड्डीवर गुन्हा दाखल करून त्याला सहआरोपी करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. रविवारी पत्रकार परिषद घेऊन दीपाली चव्हाण आत्महत्त्या प्रकरणातील गंभीर मुद्द्यांवर शिवराय कुळकर्णी यांनी लक्ष वेधले.
रेड्डींच्या बदलीवरून भाजपा महिला मोर्चाची टीका -
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जितका जबाबदार उपवनसंरक्षक शिवकुमार आहे तितकाच अपर प्रधान उपवनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी आहे. दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात रेड्डीच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. असे असताना राज्य सरकार रेड्डीची बदली नागपूरला करते. खरंतर रेड्डीची नागपूरला झालेली बदली ही राज्य शासनाकडून मिळालेली शाबासकीच आहे, असा आरोप भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अश्विनी जिचकार यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
दिपाली चव्हाण प्रकरणावर आमदार आणि खासदार राणा यांची प्रतिक्रिया -
दरम्यान, दिपाली चव्हाण यांना शिवकुमार त्रास देत असल्याची तक्रार आमदार रवी राणा यांनी पाच महिन्यांपूर्वी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना पत्र लिहून केली होती. आमदार रवी राणा यांची सही असलेले हे पत्र समोर आले आहे. तसेच रेड्डीवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी आधी राज्यपालांकडे तक्रार करणार व नंतर संसदेत आवाज उठवणार, असे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटले. दीपाली चव्हाण आत्महत्येनंतर मेळघाटातील 'रेड्डी राज'चे काळे वास्तव समोर येत आहे. खासदार नवनीत राणा यांनी तर रेड्डीची मेळघाटात पैसे खाऊ टीम असल्याचा आरोप केला आहे. उपवनसंरक्षक शिवकुमार हा अपर प्रधान उपवन संरक्षक असणाऱ्या श्रीनिवास रेड्डींच्या या पैसे खाणाऱ्या टीमचा एक सदस्य होता, असे नवनीत राणा म्हणाल्या.
खासदार राणांवर रूपाली चाकणकर यांचा आरोप -