महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'हातात चाकू-सुरे आहेत म्हणजे आम्ही गुंड नाही.. युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते आहोत' - राजकीय कार्यकर्त्यांचे वाढदिवस सेलिब्रेशन

वाढदिवसाच्या निमित्ताने तलवार आणि चाकूच्या सहाय्याने केक कापल्याचा प्रकार समोर आला आहे. राजकारणाशी संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्याने अशा प्रकारे शस्त्र प्रदर्शन करत कायद्याचे उल्लंघन केले आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कारवाई झालेली नाही.

'हातात चाकू-सुरे आहेत म्हणजे आम्ही गुंड नाही.
'हातात चाकू-सुरे आहेत म्हणजे आम्ही गुंड नाही.

By

Published : Dec 20, 2020, 8:17 AM IST

Updated : Dec 20, 2020, 8:52 AM IST

अमरावती- वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने मध्यरात्रीच्या सुमारास तलवार आणि चाकू हातात घेऊन भर रस्त्यामध्ये केक कापत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. चारच कार्यकर्ते असलेल्या व्हिडिओमध्ये बंदी असताना देखील शस्त्राच्या सहाय्याने केक कापून कायद्याचे उल्लघन्न केल्याचा प्रकार घडला आहे. तसेच हा व्हिडिओ या चारपाच कार्यकर्त्यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल देखील केला आहे.

युवा स्वाभिमान पार्टीचा मेळघाट प्रमुख उपेन बछले याने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शनिवारी मध्यरात्री शस्त्रांच्या सहाय्याने केक कापून वाढ दिवस साजरा केला. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांसह तलवार आणि चाकू सारखे प्राणघातक शस्त्र हाताळताना दिसून येत आहेत. यावेळी ते स्वत:च आम्ही अशा प्रकारे शस्त्र हाताळताना दिसत असलो तरी कोणतेही गुंड नसून युवा स्वाभिमानी पार्टीचे कार्यकर्ते असल्याची स्पष्टीकरण देत आहेत. तसेच मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या आवाजात गाणी वाजवून शस्त्राचे प्रदर्शन कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले आहे.

'हातात चाकू-सुरे आहेत म्हणजे आम्ही गुंड नाही.. यु

गोरगरिबांना ब्लँकेटचे वाटप-
दरम्यान या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन नंतर उपेन बछले आणि कार्यकर्त्यांनी शहरात उघड्यावर झोपलेल्या गोर गरीब लोकांना ब्लँकेटचे वाटपही केले आहे. मात्र, एका राजकारणाशी संबंधित असलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्याने अशा प्रकारे बंदी असलेल्या शस्त्राच्या सहाय्याने केक कापून कायदा व सुवव्यस्था बिघडवण्यास प्रोत्साहन दिल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. मात्र, या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप कारवाई झाली नाही.

Last Updated : Dec 20, 2020, 8:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details