अमरावती - कोरोनामुळे सुरू असलेल्या संचारबंदीत काळात पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा व्हावी म्हणून, पोलीस सॅनिटाईझ व्हॅन दाखल झाली आहे. त्यामुळे चौकांमध्ये किंवा इतर ठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांचे निर्जंतुकीकरण करत येणार आहे. अमरावती शहर पोलिसांच्या वतीने पोलिसांसाठी ही खास निर्जंतुकीकरण वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
अमरावती पोलिसांच्या सुरक्षेसाठी 'सॅनिटाईझ व्हॅन' दाखल - amravati police van
अमरावती शहर पोलिसांच्या वतीने पोलिसांसाठी ही खास निर्जंतुकीकरण वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यामुळे संचारबंदीत काळात पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा होणार आहे.
अमरावती पोलिसांच्या सुरक्षेसाठी 'सॅनीटाईझ व्हॅन' दाखल
राजकमल चौक येथे पोलीस उपायुक्त शशिकांत सातव आणि यशवंत सोळंके यांनी निर्जंतुकीकरण वाहन पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना बहाल केले होते. यावेळी तैनात पोलिसांनी एक-एक करून वाहनात जाऊन निर्जंतुकीकरण फवारा स्वतः वर मारून घेतला. यानंतर हे वाहन चित्र चौक येथे बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसाकडे पोहोचली आहे.