अमरावती- राज्यात संचारबंदी लागू असताना अमरावतीच्या परतवाडा शहरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. भोईपुरा परिसरात एक महिला दारू विकत असल्याची माहिती परतवाडा पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे कारवाई करत हजारो रुपयांची देशीदारू जप्त करण्यात आली आहे. तर, दुसऱ्या एका घटनेत 43 हजार रुपयांचा गुटखा आणि एक कार असा एकूण 2 लाख 63 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून यात एका महिलेचाही समावेश आहे.
अमरावतीच्या परतवाड्यात देशी दारू आणि गुटखा विक्रेत्यांवर कारवाई
सध्या राज्यात संचार बंदी लागू असल्याने बिअर बार, अधिकृत दारू विक्रीला बंदी आहे. त्यामुळे अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती परतवाडा पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने मंगळवारी सकाळी दहा वाजता पोलिसांच्या एका पथकाने धाड टाकून हजारो रुपयांची देशी दारू जप्त केली.
सध्या राज्यात संचार बंदी लागू असल्याने बिअर बार, अधिकृत दारू विक्रीला बंदी आहे. त्यामुळे अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती परतवाडा पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने मंगळवारी सकाळी दहा वाजता पोलिसांच्या एका पथकाने धाड टाकून हजारो रुपयांची देशी दारू जप्त केली. तर, दुसऱ्या घटनेत गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एकाला अटक केली असून त्याच्या कडून 43 हजारांचा गुटखा आणि एक कार असा एकूण 2 लाख 63 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ओम प्रकाश गौर असे या व्यक्तीचे नाव असून दारू विकणाऱ्या महिलेलाही अटक केली आहे.