अमरावती -केंद्र शासनाने केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात आज शेतकऱ्यांनी देशव्यापी 'चक्का जाम' करण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती-नागपूर महामार्गावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. आंदोलक हळूहळू आंदोलन स्थळावर पोचत असून आंदोलनदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी पोलीस घेत आहेत.
हेही वाचा -शेतकऱ्यांच्या समर्थनात नागपुरात विविध संघटनांचे चक्काजाम आंदोलन
रहाटगावात होणार आंदोलन
अमरावती-नागपूर महामार्गावर रहाटगाव चौकी येथे चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनस्थळी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या बॅनरखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मुस्लीम लीग, कम्युनिस्ट पार्टी, कामगार संघटना या आंदोलनात सहभागी होत आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून आंदोलक राहाटगाव येथे पोचल्यावर दुपारी दीड ते दोन वाजताच्या दरम्यान 'चक्का जाम' आंदोलनाला सुरुवात होणार आहे.