अमरावती :गाडगेनगर पोलीस ठाण्यात एका वीस वर्षीय युवतीच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याची चौकशी पोलीस अंमलदार निलेश जगताप (38) याच्याकडे होती. चौकशी दरम्यान निलेशने तिला या प्रकरणातून सोडविण्यासाठी मदत करेल असा शब्द देऊन तिच्यासोबत मैत्री वाढवली. स्वतःचा मोबाईल क्रमांक देखील निलेश जगताप याने त्या युवतीला दिला. हे दोघेही व्हाट्सअपवर चॅटिंग करायला लागले.
पोलीसाने तरूणीला मेसेज केला :दोन नोव्हेंबर 2022 ला तुझ्या प्रकरणासंदर्भात बोलायचे आहे यासाठी निलेशने त्या युवतीला पोलीस ठाण्याबाहेर भेटायला बोलावले. ठरल्याप्रमाणे हे दोघेही अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात भेटायला गेले. या ठिकाणी भेटी दरम्यान आपण चिखलदऱ्याला जाऊन बोलू असे निलेश त्या तरुणीला म्हणाला होता. यानंतर 13 मार्च रोजी निलेश जगतापने त्या तरुणीला आय लव्ह यू पिल्लू, उद्या चिखलदऱ्याला जाऊ. खूप मजा करू असा मेसेज व्हाट्सअपवर पाठवला.
चांदूर बाजार मार्गावर केला बलात्कार :निलेश जगताप या पोलिसाने संबंधित युवतीला 14 मार्च रोजी विदर्भ ज्ञान संस्थेच्या परिसरात बोलाविले. या ठिकाणी ती युवती आली असताना तिला आपल्या दुचाकीवर बसवून निलेश जगताप ने तिला चांदूरबाजारच्या दिशेने नेले. दरम्यान मार्गातच दुचाकी थांबवून त्या युवतीला निलेशने एका शेतात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या संपूर्ण प्रकाराबाबत पीडित युवतीने बुधवारी गाडगे नगर पोलीस ठाणे गाठून झाल्या प्रकाराबाबत तक्रार दिली. यावेळी त्या युवतीने निलेश जगताप यांनी व्हाट्सअपवर पाठवलेले मेसेज देखील पोलिसांना दाखविले. मात्र त्या पोलिसांनी तिच्या व्हाट्सअपवर आय लव यू पिल्लू असा आपल्या सहकारी पोलिसाचा मेसेज पाहिला तेव्हा पोलीस ठाण्यातील पोलीस चक्क हादरून गेले आणि त्यांनी आपल्या सहकारीवीरोधात गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आपल्याच पोलीस ठाण्यातील सहकारी असणाऱ्या निलेश जगताप विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :Bengal Crime News: महिलेचे भाडेकरुबरोबर प्रेमंसबंध, अडसर ठरणाऱ्या आईने केली मुलीची हत्या