महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Police raided : अवैध रेती वाहतूक; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त, धारणी पोलिसांची कारवाई - एकुण जप्त मुद्देमाल

वाळूची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर कारवाई करत अमरावती ग्रामीण पोलिसांनी पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला (Police raided on illegal sand transporter) आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून पाच लाखाचा मुद्देमाल जप्त (5 lakh worth of goods seized) करण्यात आला आहे. अमरावतीच्या ग्रामीण गुन्हे शाखा पथकाने ही कारवाई केली आहे.

Police raided
५ लाखाचा मुद्देमाल जप्त

By

Published : Dec 28, 2022, 5:14 PM IST

अमरावती :काल दि. २७ डिसेंबर रोजी एल.सी.बी.चे पथक धारणी डिव्हिजन मध्ये पेट्रोलिंग करत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की खारी फाटा, पातरपुर ते झिल्पी रोडवर अवैध वाहतूक होत आहे. मिळालेल्या माहितीवरून, विना परवाना रेती चोरून वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर सह आरोपी संतोष चुडामन लायसे, वय ३७, रा. कळमखार ता. धारणी जि. अमरावती (ट्रॅक्टर मालक) व शाम सीताराम दारसिंबे, वय २५ वर्ष रा. कळमखार ता. धारणी जि. अमरावती ( ट्रॅक्टर चालक) यांना ताब्यात घेतले. (5 lakh worth of goods seize)

एकुण जप्त मुद्देमाल : एक फार्मट्रॅक ४५ कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉली सह कींमत अंदाजे पाच लाख रुपये, एक ब्रास रेती कींमत पाच हजार रुपये एकुण जप्त मुद्देमाल ५०५००० रूपयांचा जप्त केला. पो.स्टे. धारणी येथे कारवाई करण्यात आली. ही LCB पथक कारवाई स्था.गु.शाखा चे पो.नि.श्री तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली API रामेश्वर धोंडगे, ASI दिपक उईके, युवराज मानमोठे, NPC स्वप्नील तंवर, रवींद्र वऱ्हाडे, सागर नाठे, चालक राजेश सरकटे यांनी केली आहे. (Police raided on illegal sand transporter)

ABOUT THE AUTHOR

...view details