महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वरुड तालुक्यातील आयपीएल जुगार अड्ड्यावर छापा ; 7 जणांना अटक - amravati police news

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वावरूळी स्थित यशवंत पोल्ट्री फॉर्मजवळील आईपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकली.

सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी टाकली धाड
सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी टाकली धाड

By

Published : May 3, 2021, 11:29 AM IST

अमरावती -स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वावरूळी स्थित यशवंत पोल्ट्री फॉर्मजवळील आईपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकून सात आरोपींना अटक केली.

हे आहेत आरोपी

अमोल पुंडलिक यावले(26), आकाश बाबा ब्राम्हणे (24), मुकुल शंकर गणोरकर(23), मनीष सुभाष खडसे (24), विशाल ठाकरे ( 26 सर्व रा. जरुड जरुड), मंगेश विजय बीजवे (38), निलेश साहेबराव माकोडे(32 दोन्ही रा. वरूड) अशी आरोपींची नावे आहेत.

12 लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपींकडून 27 हजार 400 रुपयांची रोख, 17 मोबाईल, 670 रुपयांचे आयपीएल जुगारातील साहित्य, एक दुचाकी आणि एक चारचाकी वाहन असा एकूण 12 लाख 32 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अनेक दिवसांपासून सुरु होता सट्टा

आईपीएल क्रिकेट सामन्यात शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यावर हातजितचा जुगार आरोपी खेळत होते. क्रिकेट सट्ट्याची माहिती मिळताच एलसीबीचे पीआय तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सुरज सुसतकर, पोलीस कर्मचारी चेतन दुबे, अमित वानखडे, युवराज मानमोठे, दीपक सोनालेकर, निलेश डांगोरे, स्वप्नील तंवर, चालक विनोद हिवरकर यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाड टाकली. त्यावेळी आरोपी हे सट्टा खेळताना दिसले. या आरोपींची धागेदोरे अनेकांशी जुळल्याची माहिती पुढे आली असून, त्या अनुषंगाने आरोपींचीही संख्यादेखील वाढणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details