अमरावती - शहरालगत राज्य राखीव पोलीस दल वसाहत परिसरात अपघात झाला आहे. चांदुर रेल्वेवरून अमरावतीला येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला व्हॅनने धडक दिली. या अपघातात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. शशांक बोराळकर असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. आगीत दुचाकी जळून खाक झाली.
असा झाला अपघात-शशांक बोराळकर ( police Shashank Boralkar accident ) हे ग्रामीण पोलीसमध्ये असणारे शिपाई अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. शशांक बोराळकर हे चांदुर रेल्वेवरून अमरावतीच्या दिशेने ( Amaravati Chandur railway road accident ) येत होते. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या व्हॅनने त्यांच्या दुचाकीला धडक ( two wheeler road accident ) दिली. मंगळवारी दुपारी झालेल्या या अपघातात प्रशांत बोराळकर गंभीर जखमी झाले. तर बरेच दूर अंतरापर्यंत घासत गेलेल्या त्यांच्या दुचाकीने पेट घेतला. अवघ्या काही वेळातच त्यांची दुचाकी पूर्णतः जळून गेली.
शिवसेना नगरसेवक आले मदतीला धावून -अपघात झाला तेव्हा या मार्गावरून जाणारे शिवसेनेचे नगरसेवक भारत चौधरी यांनी आपले वाहन थांबविले. जखमी पोलीस कर्मचऱ्याला राज्य राखीव पोलीस दल कर्मचाऱ्यांच्या मदतीने उचलून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. या अपघाताची माहिती मिळताच फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यातील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात होताच व्हॅन चालक आपले वाहन सोडून घटनास्थळावरून पळून गेला. फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.